भुसावळातील ज्येष्ठ पत्रकाराचे कोरोनाने दुदैर्वी निधन

चिमुकलीने दिला पित्याच्या मृतदेहाला दिला अग्निडाग !

भुसावळ : शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा शहरातील रानातला महादेव मंदिराजवळील रहिवासी परशुराम रामा बोंडे (55) यांचे डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत असतांना 30 मार्च 2021 रोजी रात्री 10 वाजता प्राणज्योत मावळली. दुसर्‍या दिवशी बुधवार, 31 रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या कन्येला मृतदेहाला अग्निडाग दिला.

कोरोना योद्ध्याच्या निधनाने हळहळ
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात कमालीची वाढ झाली आहे. यात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. शहरातील ज्येष्ठ पत्रकार असलेल्या परशुराम बोंडे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची मंगळवारी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परीवार आहे. बुधवार, 31 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या कन्येने तापी नदीवरील स्मशान भूमीमध्ये वडिलांच्या मृतदेहाला अग्निडाग दिला.