भुसावळातील जामनेर रोडवर एलईडी दिव्यांमुळे लखलखाट

0

भाविकांची गैरसोय झाली दूर : अप्रिय घटनांना बसणार आळा

भुसावळ- शहरातील नाहाटा महाविद्यालय ते श्री साई मंदिरादरम्यान पालिकेतर्फे गुरुवारी एलएईडी दिवे लावण्यात या मार्ग प्रकाशाने उजळला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अंधाराचे राज्य असल्याने भाविकांसह नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे तसेच मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घातल्याने जामनेर रस्त्यावर एलईडी दिवे लावण्यात आल्याने प्रकाशाने हा मार्ग उजळल्याने या भागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले. जामनेर रस्त्यावर श्री साई मंदिर तसेच श्री गजानन महाराज मंदिर असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते मात्र पथदिवे बंद असल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र आता एलईडी दिव्यांचा झगमगाट झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

एलईडी दिव्यांनी उजळला रस्ता -नगराध्यक्ष भोळे
जामनेर रस्त्यावरील श्री साईंचे मंदिर तसेच श्री गजानन मंदिर असल्याने असलेली भाविकांची वर्दळ पाहता या मार्गावर गुरूवारी एलईडी दिवे लावण्यात आल्याने हा मार्ग उजळला आहे. या दिव्यांमुळे गैरसोय टळली असून अप्रिय घटनांना आळा बसणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.

Copy