Private Advt

भुसावळातील चार वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार, तिघे जखमी

भुसावळ : शहरातील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरसमोर चार वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाल्याची भीती असून तिघे जखमी झाले आहेत. सोमवार, 11 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

एकाचवेळी एकमेकांवर आदळली वाहने
विकास दुधाची वाहतूक करणारे आयशर वाहन दुसर्‍या दूध वाहतूक करणार्‍या 407 (एम.एच.04 ई.एल.7237) ला जळगावकडे घेवून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेला डंपर (एम.एच.19 डी.यु.5895) धडकला व त्याचवेळी इंडिगो (एम.एच.45 एन.4367) येवून धडकल्याने एक जण जागीच ठार झाला तर अन्य वाहनातील तिघे जखमी झाले. अपघातामुळे महामार्ग ठप्प झाला आहे.