भुसावळातील गोकुळ नगरात घरफोडी : 20 हजारांचा ऐवज चोरीला

भुसावळ : शहरातील गोकुळ नगरातील बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांसाठी पर्वणी
भुसावळ शहरातील गोकुळ नगरात तक्रारदार दिनेश भोजलाल लोहार यांच्या भगिणी वास्तव्यास आहेत. कामानिमित्त त्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधत 1 ते 2 ऑगस्टच्या पहाटेदरम्यान घरात प्रवेश करून कपाटातील 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, चार भार चांदीचे पैंजण आणि चांदीचे शिक्के असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवला. हा प्रकार मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता लक्षात आल्यानंतर दिनेश लोहार यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.