भुसावळातील खडका रोडवरील प्रौढ महिलेची आत्महत्या

Suicide of an adult woman on Khadka Road in Bhusawal भुसावळ : शहरातील खडका रोड लक्ष्मी नगर भागातील 48 वर्षीय प्रौढ महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, 4 रोजी घडली. अजीजा शफीउल्ला खान (भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
महिलेने आत्महत्या का केली याबाबत? माहिती कळू शकली नाही. या प्रकरणी मयताच्या मुलीने बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.