भुसावळातील कोरोना विषाणूने प्रभावीत परीसरातील नागरीकांचे स्वॅब घ्या

3

भुसावळ : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून शनिवारी प्रोफेसर कॉलनी, फालक नगरातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शनिवार पर्यंत शहर व तालुक्यातील मृतांची संख्या 24 झाली आहे व एकूण बाधीत रुग्णांची संख्या रुग्ण संख्या 138 झाली असल्याने नागरीकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. प्रभाग 22 मधील प्रोफेसर कॉलनीतील वृद्ध मयत झाला असून शनिवारी शहरात आलेल्या अहवालात याच प्रभागातील आनंदनगर, प्रोफेसर कॉलनी, कस्तुरी नगर भागातील पॉझीटीव्ह समावेश आहे तर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना प्रशासनाने कॉरंटाईन केले आहे. दरम्यान, प्रभाग 22 मधील सर्व नागरीकांची आरोग्य तपासणी करावी तसेच या प्रभागात आढळून आलेल्या कोरोना पॉझीटीव्ह परीसरातील सर्व नागरीकांची त्वरीत युद्ध पातळीवर आरोग्य तपासणी करून त्यांचे सर्वांचे स्वॅब घेण्यात यावे व प्रभागातील सर्व प्रभावीत परिसर त्वरित सील करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे मागणी केली.

Copy