Private Advt

भुसावळातील कोरोना योद्ध्यांचा नगरसेवक युवराज लोणारींनी केला सन्मान

भुसावळ : कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटात जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे रुग्णसेवा बजावणार्‍या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कोविड 19 लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शहरातील आज महात्मा फुले नगर आरोग्य केंद्रातील सर्व परीचारीका, आशा वर्कर, कर्मचारी बंधूंचा उपक्रमशील नगरसेवक युवराज लोणारी यांनी भेटवस्तू देवून सन्मान केला.

आनंद फुलवण्याचा प्रयत्न : युवराज लोणारी
कोविड महामारीच्या काळातही प्रामाणिक आपला जीव धोक्यात घालून नागरीकांसाठी अहोरात्र सेवा बजावणार्‍या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केल्याने निश्‍चितच त्यांना अधिक काम करण्याची उभारी येईल, असे प्रसंगी नगरसेवक लोणारी म्हणाले. तुटपुंज्या मिळणार्‍या मानधनात/वेतनात ते खुश असून आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असून कोरोना विरुद्धच्या लढ्यात त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि आभार मानण्यासाठी ही भेटवस्तू देण्यात आल्याचे नगरसेवक लोणारी म्हणाले.