भुसावळातील कंटेनमेंट झोनमधील वाहतूक बंद करून नियम मोडणार्‍यांवर कारवाई करा

0

भुसावळ : भुसावळात कोरोना रुग्णांची संख्या भविष्यात न वाढण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची गरज असून संचारबंदी सुरू असल्याने नागरीकांनी विनाकारण बाहेर पडू नये तसेच कंटेनमेंट झोन भागातील बँका, दवाखाने, दुकाने तातडीने बंद करण्यासह या भागातील वाहतूक तातडीने थांबवावी शिवाय न ऐकणार्‍या नागरीकांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी सोमवारी दुपारी आढावा बैठकीत केल्या. प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी आढावा बैठक झाली.

विनाकारण फिरणार्‍यांवर दाखल होणार गुन्हे
संचार बंदीच्या काळात नागरीकांनी बाहेर पडू नये तसेच अत्यंत महत्त्वाचे काम असल्यानंतर घराबाहेर पडावे मात्र विनाकारण फिरणार्‍यांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा प्रांताधिकार्‍यांनी दिला आहे. या बैठकीला डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धीवरे, पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आणि बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत उपस्थित होते.

Copy