भुसावळातील इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी : आरोपींकडून 38 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

भुसावळ : मॉडर्न रोडवरील टपाल कार्यालयालगत असलेले हरी ओम इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील सुमारे अडीच लाखांच्या चोरी प्रकरणी फिरोज शेख अकिल गवळी (24, रा.जाम मोहल्ला, मशीदजवळ भुसावळ) व रज्जाक उर्फ राजा शेख रहीम (28 रा.जाम मोहल्ला, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिस चौकशीत आरोपींनी 38 हजार रुपये किंमतीचे तीन टीव्ही पोलिसांना काढून दिले आहेत. तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.