भुसावळातील आरोग्य विभागासाठी 20 लिटर सॅनिटाइजर

0

भुसावळ : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका आरोग्य विभागासाठी बारामती ग्रो व आमदार रोहित पवार यांच्यातर्फे व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र इनाना पाटील यांच्या सहकार्याने 20 लिटर सॅनिटाइजर देण्यात आले व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 500 लिटर सॅनिटाइजर देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे, गट शिक्षणाधिकारी टी.डी.प्रधान, किन्ही सरपंच हर्षा येवले, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी आर.के.गायकवाड, डॉ.कल्पना दवंगे, उपसरपंच प्रदीप कोळी, कैलास येवले, जी.आर.चौधरी आदी उपस्थित होते.

Copy