Private Advt

भुसावळातील आनंद लॉजवर छापा : आंबटशौकीन ग्राहकांसह पाच वेश्या ताब्यात

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने सोमवार, 21 रोजी दुपारी अचानक छापा मारत पाच वेश्यांसह (वारांगणा) जिल्ह्यातील पाच आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांना हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस पथकाने छापा टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पाच वेश्यांसह ग्राहक जाळ्यात
पोलिसांच्या पथकाने लॉजमधून पाच वेश्यांसह पाच आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे शिवाय अनैतिक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

शहरातील हॉटेलसह लॉजेसची व्हावी तपासणी
अनैतिक प्रकारांना शहरात पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने भुसावळ शहरातील सर्वच हॉटेल्सह लॉजेसची कसून तपासणी करावी, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरीकांकडून केली जात आहे. हॉटेल/लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.