Private Advt

भुसावळहून परप्रांतीयांसाठी धावली सहरशासाठी श्रमिक एक्स्प्रेस

0

भुसावळ : लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी राज्य शासनाने स्वखर्चातून रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला भुसावळातून लखनऊ व गोरखपूरसाठी विशेष गाडी सोडण्यात आल्यानंतर शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता प्लॅटफार्म क्रमांक सातवरून 01857 भुसावळ-सहरशा एक्स्प्रेस रवाना झाली. या गाडीत जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार व बुलढाणा भागात अडकलेल्या एक हजार 224 प्रवाशांना प्रवेश देण्यात आला.

परप्रांतीय प्रवाशांना दिलासा
01857 भुसावळ-सहरशा एक्स्प्रेसने बुलढाणा येथील 212, जळगाव जिल्ह्यातील 747, धुळे जिल्ह्यातील 203 तर नंदुरबार जिल्ह्यातील 62 मिळून एकूण एक हजार 224 प्रवासी रवाना झाले तर प्रति पॅसेंजर 650 रुपयांप्रमाणे तिकीटाचा खर्च राज्य शासनाकडून करण्यात आला. रेल्वे स्थानकावरील प्लॅट फार्म क्रमांक सातवर लावण्यात आलेल्या गाडीत सोशल डिस्टन्स राखून प्रवाशांना रवाना करण्यात आली. यावेळी डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदी अधिकारी तसेच लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व त्यांचे पोलिस कर्मचारी स्थानकावर होते.