भुसावळच्या महिलेचा रेल्वेखाली पाय कापला

0

जळगाव : बोदवड रेल्वेस्थानकावर रेल्वेतून एक महिला उतरत होती. अचानक रेल्वे सुरू झाल्याने त्या महिलेचा तोल जावून तिचा पाय रेल्वूखाली सापडून कापला गेला. ही. घटना गुरूवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जखमी महिलेस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते.

फिरोजा बी शेख मोबीन (वय-25 रा. जाम महोल्ला, भुसावळ) ही महिला ननंद शमा बी यांच्या समवेत भुसावळहून सकाळच्या अमरावती पॅसेंजरने उजणी या गावाला जात होती. रेल्वे 7.30 वाजेच्या सुमारास बोदवड रेल्वेस्थानकावर आली असता. फिरोजा बी रेल्वेतून उतरत असतांना अचानक रेल्वे सुरू झाली. यात फिरोजा बी हिचा तोल जावून तिचा पाय धावत्या रेल्वेखाली आला. नागरिकांनी धाव घेत फिरोजा बी हिला बाहेर काढले. मात्र, या अपघात तिचा पाय कापला गेला. दरम्यान महिलेची प्रकृति चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.