भुसावळच्या तरुणाचा मध्यप्रदेशात निर्घृण खून

0

भुसावळ : शहरातील नसरवांजी फाईल भागातील रहिवासी व रेल्वेस्थानबाहेर पान विक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मध्यप्रदेशातील शिवडी जिल्ह्यातील छिंदवाडा येथे निर्र्घृण खून झाल्याची घटना बुधवार, 8 जानेवारी रोजी रात्री घडली. निजाम उर्फ काल्या राजू गवली (18) असे मृत तरुणाचे नाव आहे.

खुनाचे कारण गुलदस्त्यात
नसरवांजी फाईल, गवळीवाडा भागातील आसुरखाना येथील रहिवासी निजाम उर्फ काल्या राजू गवली (18) हा तरुण भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर पान विक्रीचा व्यवसाय करीत होता. 7 जानेवारी रोजी रात्री तो आपल्या एका मित्रासोबत नागपूर जवळील छिंदवाडा येथे गेला होती मात्र 8 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याचा धारदार शस्त्राने निर्घुणपणे खून करण्यात आला. यापूर्वी रीक्षा चालक असलेले त्याचे वडील राजू गवली यांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील रतलाम येथे मानसिक आजारातून रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली होती. दरम्यान, या खुन प्रकरणी मारेकरी सुलतान नामक तरूणासह काही मारेकर्‍यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, दोन भाऊ, आजी, आजोबा असा परीवार आहे. शुक्रवारी सकाळी शिवडी येथून मृतदेह आल्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.