भुसावळचे माजी नगराध्यक्ष भोळेंसह सर्व नऊ नगरसेवकांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

भुसावळ – पालिकेच्या गेल्या निवडणुकीत‎ भाजपच्या चिन्हावर‎ निवडून आलेल्या नगरसेवकांनी,‎ पालिकेची मुदत संपण्यापूर्वी‎ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला‎ होता. त्यामुळे माजी नगराध्यक्ष‎ रमण भोळेंसह नऊ‎ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी‎ अपात्र घोषित केले होते. या‎ प्रकरणी नगसेवकांनी औरंगाबाद‎ खंडपीठात याचिका दाखल‎ केली होती. या याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने या सर्व नऊ माजी नगरसेवकांना दिलासा दिला आहे त्यामुळे या सर्व माजी नगरसेवकांचा पुढील निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याचिकेवर‎ सोमवारी (दि. ६) न्या. अरुण‎ पेडणेकर यांनी निकाल दिला.‎ जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिलेल्या सहा वर्षांसाठीची‎ अपात्रता रद्द केली आहे. केवळ‎ एका टर्मसाठी अपात्रता करण्यात‎ आली. मात्र मुळातच टर्मचा‎ कालावधी संपल्याने आता‎ अपात्र नगरसेवकांना पालिकेची‎ पुढील निवडणूक लढता येणार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.‎ पालिकेच्या २०१६ च्या‎ निवडणुकीत लोकनियुक्त‎ नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह‎ नऊ नगरसेवक भाजपच्या‎ चिन्हावर निवडून आले होते.‎
सहा वर्ष अपात्रेचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने रद्द केल्यामुळे माजी‎ नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह माजी नगरसेवक अमोल इंगळे (‎ प्रभाग १ – ब),लक्ष्मी रमेश मकासरे ( प्रभाग १ अ), सविता रमेश‎ मकासरे (प्रभाग २ अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६ ब), मेघा‎ देवेंद्र वाणी (१० अ), अॅड. बोधराजदगडू चौधरी (९ ब), शोभा‎ अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते ( २२ ब), शैलजा‎ पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) यांना दिलासा मिळाला आहे.‎
पालिका निवडणुकीत चुरस वाढणार
रमण भोळे यांच्यासह शहरातील नऊ दिग्गज माजी नगरसेवकांना लवकरच होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत उमेदवारी करता येणार नाही, त्यामुळे आपल्यासाठी निवडणूक सोपी झाली आहे, असे समजून निवडणुकीची वाट पहाणार्यांंचा हिरमोड झाला आहे. कारण जिल्हाधिकारी यांनी सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले, असले तरी औरंगाबाद खंडपीठाने मात्र अपात्रतेचा निर्णय केवळ एका टर्म करिता लागु केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मध्ये काट्याची टक्कर पहायला मिळू शकते.