भुसावळकरांना मिळणार घरपोहोच भाजीपाला व फळे

0

श्री सतं गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या अभियंत्यांनी बनवले मींक्षा अ‍ॅप्स

भुसावळ : कोरोनामुळे संचारबंदी सुरू असल्याने व कोरोना हा संसर्गजन्य असल्याने प्रशासनाने नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडावे लागत असल्याने नागरीक व पोलिस प्रशासनात वाद उद्भवत असल्याने नागरीकांना घरपोहोच सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले भावी अभियंते मितेश गुजर, सुरज पाटील व मृगेन कुलकर्णी व शेतकरी संघ, दापोरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असताना नागरीकांच्या आरोग्यासाठी मींक्षा अँप्स तयार करण्यात आले आहे. भुसावळात या अ‍ॅपचे उद्घाटन ज्येष्ठ नागरीक शशिकांत वाघ, प्रा.धीरज पाटील, सुरज पाटील, मृगेन कुळकर्णी यांनी मंगळवारी केले.

नागरीकांना घरपोहोच मिळणार भाजीपाला व फळे
संचारबंदी असल्याने घरपोच भाजी, फळे देण्याची सुविधा जळगाव, एरंडोल नंतर भुसावळ शहरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुविधा उपलब्ध करून देतांना कोरोना विषाणू नियंत्रणाची सर्व नियम पाळले जाणार आहेत. भाजीपाला घरपोच प्राप्त करण्यासाठी इच्छुकांनी या अ‍ॅपद्वारे आपण ऑर्डर करावी. त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. ऑर्डरची रक्कम शक्यतो नेटबँकिंग, कार्ड, गूगल पे अथवा फोन पे अथवा अन्य कोणत्याही क्यू आर कोडच्या डिजिटल पद्धतीने भाजीपाला डिलिव्हरीसाठी आल्यावर जमा करता येणार आहे. भाजीपाला डिलिव्हरीसाठी आल्यावर सर्वांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण ऑर्डर दिलेल्या भाजीपाल्याची डिलिव्हरी 24 तासांच्या आत देण्यासाठी प्रयत्न राहील, असे मितेश गुजर याने सांगितले. कोरोनाच्या काळात अत्यंत प्रभावीपणे हे अ‍ॅप काम करणार असून बाजारातून भाजीपाला घेतांना अनेक ग्राहकांचा भाजीपाल्याला स्पर्श होतो तसेच लोकांची गर्दी झालेली दिसते त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो, कोरोनामुळे उद्भवलेल्या अशा गंभीर परीस्थितीत भुसावळकरांना थेट घरपोच भाजीपाला आणि फळे तेही अत्यंत कमी भावात देण्याचे काम ही शेतकर्‍याची मुलं करता आहेत व तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता करणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ.पंकज भंगाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Copy