भीषण आगीत 25 ते 30 झोपड्या जळून खाक, लॉकडाऊनमध्येच रहिवाशी झाले बेघर

0

नाशिक – शहरातील भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातील झोपडपट्टीला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत जवळपास 25-30 झोपड्या जळून खाक झाली. अतिशय दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळ असलेल्या या परिसरात घरातील जवळपास ७ पेक्षा अधिक सिलेंडर्सचा या आगीत स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच १५-२० अग्निशमन बंबांच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. येथील सर्व रहिवाशी बेघर झाले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था बी. डी. भालेकर मैदान येथे करण्यात आली आहे.

करोनामुळे परिसरातील सर्व रस्ते सील करण्यात आले असल्यामुळे सुरुवातीला या परिसरात अग्निशमन बंब यायला काहीसा उशीर झाला होता. आगीची तीव्रता लक्षात घेता वरिष्ठ अधिकार्‍यांनी जुन्या नाशिकमध्ये येणारे रस्ते उघडण्याचे आदेश दिल्यानंतर हा परिसर वाहतुकीस खुला झाला.

Copy