भीम आर्मीचे नेते अॅड. चंद्रशेखर आझाद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

0

मुंबई : भीम आर्मी संघटनेचे नेते अॅड. चंद्रशेखर आझाद लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. उत्तर प्रदेशातील शब्बीरपूर येथे २०१७ मध्ये झालेल्या जातीय हिंसेनंतर भीम आर्मी संघटनेचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यासह या संघटनेच्या एक हजारहून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. यातील सर्व कार्यकर्त्यांची मुक्तता झाली असली तरी तेथील प्रशासनाने आझाद यांच्याविरोधात कारवाई केली होती. हा रासूका संपण्यापूर्वी दोन महिने अगोदर आझाद यांची सुटका करण्यात आली.

या सव्वा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भीम आर्मी प्रसिद्धीझोतात आली. आज या संघटनेच्या देशातील २६ राज्यात विस्तार झाला असून महाराष्ट्रात या संघटनेने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. त्यामुळे आझाद यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्रात चारही महसुली विभागात आझाद यांच्या सभेचे नियोजन करण्याची तयारी असून या ठिकाणी जाहीर सभेचे निमंत्रण आझाद यांना देण्यात आल्याचे या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी बैठकीत सांगितले .मुंबईतील दादर चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी, भिमाकोरेगाव विजयस्तंभ तसेच वढू गाव या ठिकाणी आझाद आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भेटी देणार आहेत.

Copy