भिवंडीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग !

0

भिवंडी – मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. आज देखील भिवंडीतील राहनाल गावाच्या हद्दीतील प्लास्टिक गोदामामध्ये भीषण आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. गोदामामध्ये केमिकलचा साठा असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले आहे. आगीमुळे परिसरात मोठे-मोठे धुराचे लोट पसरले आहेत.