भिलाई स्टील प्रकल्पामध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट ; ६ जण ठार

0

रायपूर : छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्रकल्पामध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला. या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यावर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे नियंत्रण आहे.

आज या स्टील कारखान्यामध्ये गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येत होती. यावेळी एका मोठ्या स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाले. हा प्रकल्प रायपूरपासून केवळ 30 किमी दूर आहे. स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली आहे. घटनास्थळी 8 ते 10 अग्ऩिशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 2014 मध्येही याच कारखान्यामध्ये देखभालीवेळी पंपाचा स्फोट झाला होता. यानंतर जवळून जात असलेल्या गॅस पाईपलाईनमधून गॅस गळती झाली होती. यामुळे कार्बन मोनॉक्साईड हवेमध्ये पसरला होता. यामुळे 6 जण ठार झाले होते. तर 34 जण जखमी झाले होते.

Copy