भिरडाणे शिवारात जुगाराचा डाव उधळला

0

एक लाखांच्या रोकडसह नऊ आरोपी जाळ्यात
तीन कारसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे:भिरडाणे आणि कासविहिर गावाच्या शिवारात शेतात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. कारवाईत एक लाख दोन हजार 620 रुपयांच्या रोकडसह तीन कार मिळून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच नऊ आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी,15 रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. आरोपींविरुद्ध धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या आरोपींना अटक
पोलिसांनी सचिन प्रकाश परदेशी (अजंग), लिलाचंद चैत्राम कोळी (शहापूर, ता.अमळनेर), नितीन बाजीराव शेळके (अंबोडे, जि.धुळे), दिनेश प्रकाश पाटील (मुकटी), भाईदास तोंगल कोळी (बेटावद, ता.शिंदखेडा), प्रवीण दयाराम पाटील (वासरे. ता.अमळनेर), पुंडलिक शंभू पाटील (एकतास, ता.अमळनेर), महेंद्र प्रतापराव देशमुख (बेटावद, ता.शिंदखेडा), अविनाश लोटन पाटील (भिलाली, ता.अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे, अनिल पाटील, सुनील विंचूरकर, चेतन कंखरे, सागर शिर्के, किशोर पाटील, गुलाब पाटील आदींनी केली.

Copy