भावेर येथील शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

0

शिरपूर:तालुक्यातील भावेर येथील एका 52 वर्षीय शेतकर्‍याने 10 जून रोजी दुपारी शेतातील झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. विरेंद्र गुलाबसिंग राजपूत असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे भावेर गावावर शोककळा पसरली आहे.
भावेर येथील शेतकरी विरेंद्र राजपूत हे अनेक दिवसांपासून शेतात झालेल्या उत्पन्नाच्या नुकसानीमुळे चिंतेत होते, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या केलेल्या शेतकरी विरेंद्र राजपूत यांंना दोन मुले होती. त्यात लहान मुलाचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यातच आता विरेंद्र राजपूत यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनास्थळी थाळनेर पोलिसांनी भेट दिली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत विरेंद्र राजपूत भावरे गावाचे तंटामुक्त अध्यक्ष होते.

Copy