भावगर्भी काव्यचांदण्याला लगडली कृतज्ञतेची पुण्याई!

0

जळगाव । आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग कविता आणि ललित लेखनाने सा-या महाराष्ट्राला वेड लावलेल्या रसिकप्रिय सुप्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचा अमृत महोत्सवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘कृतज्ञता’ सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, रामदास भटकळ, शरद काळे आणि हेमंत टकले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सांस्कृतिक स्वरूपाच्या या कार्यक्रमात महानोरांचे वेगळेपण सांगणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारी व त्यांच्या साहित्याचे रसग्रहण करणारी काही मनोगते दृकश्राव्य स्वरुपात सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात कवितांचे अभिवाचन श्रीरंग देशमुख, अमृता मोरे, हेमंत टकले आणि दत्ता बाळसराफ यांच्या कडून करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम शनिवार दिनांक 4 मार्च 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता, रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जनरल जगन्नाथ भोसले मार्ग,नरीमन पोईंट, येथे होणार आहे.