भालोद येथे उर्दू कवी संमेलन उत्साहात

0

यावल। तालुक्यातील भालोद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पटांगणावर निदा सार्वजनिक वाचनालयातर्फे उर्दू कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होेते. या मुशायराचे उद्घाटन ज्येेष्ठ साहित्यिक एम. रफिक यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. साबिर खान होते. दरम्यान, प्रख्यात कवी अहद अमदज बुरहानपुरी, रईस फैजपूरी, हबिब मंजर, कामिन हकिम सुरत, जमिर अडावदी, शकिल अन्वर, मजिद आतिश, आरिफ हन्फि, शाहिद मुहफट यांनी अत्यंत मार्मिक व रसगर्भित शेरोशायरी सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुत्रसंचालन बुरहानपुर येथील सखावत फारुकी यांनी केले.

प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष जाबिर खान, मुनाफ खान यांनी अतिथींचे स्वागत केले. यावेळी एस.एम. अन्वर, सलाउद्दीन, सईद खान, इरफान, बिस्मिल्ला, हाफिज जलिस आदी मान्यवर तसेच फैजपूर, यावल परिसरात असंख्य श्रोते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी इस्माईल खान, इमरान खान, सादिक खान, जावेद खान आदींनी परिश्रम घेतले.