Private Advt

भालोदच्या तरुणाची आजारास कंटाळून आत्महत्या

यावल : आजारास कंटाळून भालोदच्या 31 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. रवींद्र प्रभाकर जावळे (31) असे मयताचे नाव आहे.

विहिरीत आढळला मृतदेह
शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा रवींद्र हा गुरुवारी सायंकाळी शेत शिवारात गेला असता घरी न परतल्याने शोध सुरू असतानाच भालोद-बामणोद रस्त्यावरील एकविरादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या अशोक चिंतामण चौधरी यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला.

फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
आत्महत्येपूर्वी रवींद्र जावळे याने आपल्या अंगावरील कपडे व चप्पल विहिरीच्या काठावर ठेवली. फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक किरण चाटे करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, बहिण, मेहुणे असा परीवार आहे. आजारास कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.