भारिप बहुजन महासंघातर्फे गण व गटातील इच्छुकांच्या मुलाखती

0

भुसावळ । भारिप बहुजन महासंघाच्या रावेर लोकसभा विभागीय जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या इच्छूक उमेदवारांसाठी रविवार 22 रोजी चव्हाण ऑप्टिकल्स कॉन्फरन्स हॉलमध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आल्या आहे. यावेळी जिल्हा निरीक्षक शरद वसतकर व जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यानुसारच जिल्ह्यात तयारी करण्यात येत आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी उपस्थित राहावे व तालुकास्तरीय निवडणूक निरीक्षक समित्या तयार करण्यात येतील. तरी रावेर लोकसभा विभागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रभाकर इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, शिवाजीराव टेंभुर्णीकर, चोपडा नगरसेवक अशोक बाविस्कर, विश्‍वनाथ मोरे, समाधान गवई, प्रमोद बावस्कर, संजय कांडेलकर, बाळू शिरतुरे, साधना झाल्टे, पंढरीनाथ महाजन, सचिन बार्‍हे, काशिनाथ गायकवाड, राजू तायडे, संगम निकम, राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.