भारनियमन लवकरच कमी होणार

0

भुसावळ। ज ळगाव रोड परिसरातील पीसी 2 भागातील ग्राहकांचे विज मीटर रीडिंग 45 दिवसानंतर घेण्यात आले होते. रीडिंग उशिरा घेतल्याने एप्रिल – मे 2017 चे साधारण पेक्षा 30 टक्के जास्त लाखो रुपयांचे अतिरिक्त विज बिल येणार आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांना रीडिंग स्लॅबचा बेनीफिट देण्यात यावा अशी मागणी करण्यात आल्यानंतर सर्वच ग्राहकांना नियमानुसार स्लॅब बेनिफिट देण्यात येणार आहे. तसेच भुसावळ परीसरातील भारनियमन कमी करणार असल्याचे कार्यकारी मुख्य अभियंता आलेगावकर यांनी सांगितले आहे.पीसी 2 क्षेत्रातील श्रीनगर, भोईनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलनी, रेल दुनिया, वरद विनायक कॉलनी, गणेश कॉलनी, मोहितनगर, भिरुड कॉलनी, अयोध्यानगर , विद्यानगर, खळवाडी, शिवकॉलनी परिसर, स्वामी विहार, शालीन पार्क, स्वरुप कॉलोनी, वरद विनायक कॉलोनी, महालक्ष्मी नगर, सीताराम नगर, नारायण नगर 1, 2 व 3, गोदावरी नगर, मोरेश्वर नगर आदी भागातील 20 हजार पेक्षा जास्त ग्राहकांचे विज मीटर रीडिंग चक्क 45 दिवसानंतर घेण्यात आलेले होते.

यांची होती उपस्थिती
रीडिंग उशिराने घेतले गेल्याने एप्रिल – मे 2017 चे साधारणपेक्षा 30 टक्के जास्त बिल येईल. लाखो रुपयांचे अतिरिक्त विज बिल येणार आहे. या भागातील ग्राहकांना रीडिंग स्लॅबचा बेनीफिट देण्यात यावा अशी मागणी प्रा.धिरज पाटील, रवि वर्मा, संदीप पाटील, सी.एस. पाटील, जयंत चौधरी, विलास भारंबे, गणेश पाटील, चंद्रकांत सरोदे, दर्शन नेहेते व नागरिकांनी केली होती. यासंदर्भात जळगाव रोड परिसरातील या ग्राहकांनी मंगळवार 9 रोजी तापी नगर येथील मुख्य कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय गाठले.

त्वरीत कारवाई करावी
पीसी- 2 क्षेत्रातील 20 हजार पेक्षा जास्त ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार असून कोणालाही अतिरिक्त अर्ज करण्याची गरज नाही. तसे आदेश अकाउंट विभागाला देण्यात येतील. असे आश्वासन विज वितरण कंपनीतर्फे आलेगावकर यांनी दिले आहे. त्यासाठी एक सामूहिक अर्ज वीज कंपनीकडे वीज ग्राहक क्रमांकासह सादर करण्यात आला तसेच सर्व ग्राहकांना वाढीव बिलाची रक्कम स्लॅब बेनिफिट देवून कमी करण्याची मागणी प्रा.धीरज पाटील यांनी विज वितरण कंपनीला केलेली आहे. वीज वितरण कंपनीच्या दीपनगर उपकेंद्रातून भारनियमना व्यतिरिक्तही अनियमित वीजपुरवठा होत आहे. वेळी-अवेळी वीज गायब होण्याच्या प्रकारांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वीज वितरण कंपनीने त्वरित कारवाई करणे
गरजेचे आहे.

कायमचा तोडगा काढावा
तसेच भुसावळ परिसरातील भारनियमन बंद करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. वारंवार एकच समस्या निर्माण होते यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा. ग्राहकांची पिळवणूक थांबवावी असे मत संदीप पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच मागील वर्षी 45 हजार 167 रुपये ग्राहकांचे विज बिलातून कमी करून देण्यात यशस्वी झालो होतो. या वेळेसही रक्कम लाखो रुपयात असेल. पाठपुरावा यशस्वी होण्याचा आनंद आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी कळवले आहे.