भारत, सर्बियात सहकार्य कृती आराखडा

0

मुंबई : परस्पर समन्वय, सहकार्य आणि सुसंवादातून भविष्यात भारत आणि सर्बिया देश एकत्र येऊन उत्तम काम करतील. देशांचे संबंध आणखी दृढ करताना दोन्ही देशांत उद्योग-व्यापार वाढीसाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाईल,असे सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांनी सांगितले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांच्याहस्ते ‘बेल रिंगिंग’ सिरेमनी 12 रोजी संपन्न होऊन मार्केटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.भारत आणि सर्बिया देशाचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले आहे. गुंतवणूक वाढण्यासाठी कृती आराखड्याद्वारे भरीव प्रयत्न केले जातील.

महाराष्ट्र, गुजराथ सर्बियाच्या दृष्टीने महत्वाचे
दोन्ही देशाचे जुने नाते अधिक सुदृढ होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र, गुजरातसारखी राज्ये सर्बियासाठी उद्योग-व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची राज्ये आहे. भारतीय उद्योजकांचे सर्बियामध्ये हार्दिक स्वागत आहे.विश्वातील सर्वात मोठ्या मार्केटचा, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या दिवसाचा शुभारंभ रिंगिग बेल सोहळ्याद्वारे करता आला, याबद्दल विशेष आनंद वाटत असल्याचे सांगताना त्यांनी मार्केटच्या तसेच त्या माध्यमातून होणार्‍या देशाच्या आर्थिक सक्षमतेसाठी यश चिंतून पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक शुभेच्छा दिल्या.