भारत-चीन तणाव; पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक

0

नवी दिल्ली – भारत-चीन सिमेवर सिक्कीम आणि लडाखमध्ये तणाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत हजर होते. यात आगामी रणणितीवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

लडाखजवळ चीनकडून हवाई तळाचे काम सुरु असून सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये चीनने हवाईतळावर लढाऊ विमानंही तैनात केले असल्याचे दिसत आहे. सॅटेलाइट फोटोंमध्ये तिबेटमधील नगरी गुनसा विमानतळावर मोठ्या प्रमाणात चीनकडून बांधकाम सुरु असल्याचे दिसत आहे. एका महिन्याच्या अंतराने काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये चीन हेलिकॉप्टर किंवा लढाऊ विमानांसाठी धावपट्टी तयार करत असल्याचे दिसत आहे.
भारताने लडाखमधील गालवान व्हॅली येथे बांधकाम सुरु केल्यानंतर तणाव वाढण्यास सुरुवात झाली. लडाखच्या गालवान व्हॅली भागात धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंत रस्ता बांधण्यात आला आहे. दौलत बेग ओल्डीमध्ये भारताने अत्याधुनिक धावपट्टी सुद्धा बनवली आहे. ही जगातील सर्वात उंचावरील धावपट्टी असून इथे इंडियन एअर फोर्सचे उ-१३० ग विमान उतरु शकते. रणनितीक दृष्टीने भारतासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डी याच मार्गाने भारत काराकोरम हायवेपर्यंत पोहोचू शकतो. त्यावरच चीनचा आक्षेप आहे.

Copy