भारतीय सैन्यात भालाफेकपटू नीरज चोप्रा दाखल!

0

नवी दिल्ली । भारताचा विश्वविक्रमी भालाफेकपटू ज्युनियर अ‍ॅथलेटिक्समधला नीरज चोप्राला भारतीय सैन्याने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. नीरज ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलाच्या सेवेत दाखल झाला आहे.गेल्या वर्षी पोलंडमध्ये झालेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने 86.48 मीटर्स अंतरावर भालाफेक करुन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती.विशेष म्हणजे रिओ ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या खेळाडूच्या 85.38 मीटर्स या कामगिरीपेक्षा नीरजची कामगिरी सरस आहे.सेनादलाच्या सेवेत रुजू झाल्यामुळे आता आपल्याला कामगिरी आणि कुटुंबीयांवरही लक्ष केंद्रीत करता येईल, असे नीरज चोप्राने म्हटले आहे.