भारतीय दूतावासाला कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी द्यावी; पाककडे भारताची मागणी

0

नवी दिल्ली- परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्‍वराज यांनी दोन दिवसापूर्वी पाकिस्तानला अटकेत असलेल्या कुलभूषण जाधवची भेट घेण्यास भारतीय दूतावासास संधी द्यावी अशी मागणी केली होती. भारतीय नौदालाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अंतरराष्‍ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिस (आईसीजे) मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भारतीय दूतावासाला कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.

मिलिट्री कोर्टच्या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलेली आहे. यावर सुनावणी होणार आहे.

Copy