भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईची नवी कार्यकारिणी जाहीर

0

मुंबई – नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरूण चेहऱ्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी आपल्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करताना त्यात मुंबई महापालिकेच्या पाच नगरसेवकांचा समावेश केला आहे.

भाजयुमोच्या पुनर्गठनाबद्दल बोलताना कंबोज म्हणाले की, नव्या कार्यकारिणीत भाषानिहाय तसेच क्षेत्रनिहाय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून समाजाच्या प्रत्येक वर्गाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नवी कार्यकारिणी तरूणांच्या अपेक्षा पूर्ण करेल.

नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- सागर सिंह ठाकूर, शीतल गंभीर, हर्ष पटेल, प्रीती साटम, रोहन राठोड, नैनेश शाह, योगेश गिरकर, शंतनु अगस्ती, अमित शेलार, शायली कुलकर्णी आणि अमर पावले (सर्व उपाध्यक्ष), तेजेंदर सिंह तिवाना (संघटन महामंत्राी), हर्ष महेता, निखिल व्यास, मनोज कुमार तिवारी, वाहिद शाह (सर्व महामंत्री), हर्षल मंत्री, परमजीत सिंह नंदजोग, राज नथानी, अविनाश राय, तहवेश शेख, जय नगवणी, आशीष साळसकर, हर्षद भिडे आणि वरूण घैसास (सर्व मंत्री), गोपाळ दळवी (कोषाध्यक्ष), अंकिता चौधरी (युवती मोर्चा अध्यक्ष),  कुणाल केरकर (स्पोर्टस सेल प्रमुख), अभिषेक त्रिपाठी (सोशल मिडिया प्रमुख), राज कार्ला ( सहप्रमुख) विकास सिंह गौर (लीगल सेल प्रमुख), श्रीधर वर्कोल (सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख), आदित्य जैन (सहप्रमुख), श्रेयश शाह (महाविद्यालय प्रमुख), नितीन गावडे, हिमांशू पडवळ, दीपक सावंत, विक्रम मल्होत्रा आणि राजू अंबतोर (कार्यकारिणी सदस्य).