भारताने सामन्यासह मालिका जिंकली

0

कर्णधार कोहली सामनावीर , 17 व्या कसोटीत भारताचा विजय, आश्‍विनचे डझनभर बळी,
मुंबई – इंग्लंडला चौथ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी व गोलांदाजीच्या जोरावर भारताने 3-0 अशी आघाडी घेतली. भारतासाठी हा विजय ऐतिहासिक होता. 8 वर्षाच्या काळानंतर भारताने इंग्लंडविरूध्दची मालिका जिकली आहे. चौथ्या सामन्याचा सामनावीर म्हणुन पुरस्कार मिळाला.पहिल्या डावात विराटाच्या बॅटने 235 धावा काढल्या त्यात 25 चौकार व एक षटकार लावला होता. याच बरोेबर मुरली विजय,जयंत यादव याच्या शतकी खेळी याचबरोेबर 8 व्या विकेटच्या भागीदारीत 241 धावा काढल्या.यामुळे भारताने 631 धावावर मजल मारली होती.भारताने इंग्लंडला एक डाव 35 धावांनी पराभुत केले.या कसोटीत आर.आश्‍विनच्या गोलदांजी जादू चालली या कसोटीत 12 बळी घेतले.

वानखेडेच्या मैदानावर इंग्लंडविरूध्दच्या चौथ्या सामन्याच्या शेवटचा दिवस पाहुण्यांचा संघ खेळेल असे वाटत होते. मात्र पुन्हा वानखेडेच्या मैदानावर आर.आश्‍विन याच्या गोलदाजीची जादू चालली . कालच्या 182 /6 पुढे खेळतांना अवघ्या 13 धावा काढत ते सर्व फलंदाज बाद झाले.आर.आश्‍विने बेअरस्टॉला बाद केले. यानंतर सर्व फलंदाजीने मैदानावर आपली हजेरी लावली. आणि तंबूत परत गेले.इंग्लंडच्या संघाने सकाळच्या सत्रात 9 षटके मैदानावर टिकू शकले.

पाहिल्या डावात नाणेफेक जिंकून इंग्लडने प्रथम फलंदाजी स्विकारून 400 धावा केल्या. या धावाचा पाठलाग करतांना भारताच्या मुरली विजय,जयंत यादव याच्या शतकी खेळी,याच्यासह कर्णधार विराट कोहली याच्या व्दिशतकीय खेळीमुळे भारताने 631 धावा केल्या.पाहुण्यांना 231 धावाची आघाडी घेतली. दुसर्‍या डाव खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने चौथा दिवसा अखेर 182/6 अशा धावा केल्या.मात्र शेवटच्या दिवसी त्याच्या उर्वरित फलंदाज फक्त 9 ओव्हरचा सामना करू शकलो.सर्व इंग्लंडचा संघ 195 धावावर बाद झाला.यावेळी आर.आश्‍विन याने दुसर्‍या डावा 6 गडी बाद केले.

वानखेडेवर ऐतिहासिक विजय
भारताने 3-0 हि मालिका जिकली आहे. या विजयाबरोबर भारताने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळविला. 8 वर्षांनी भारतीय संघाने इंग्लंडविरूध्द मालिका जिकली.इंग्लंडने भारताला 2011,2014, व 2015 मध्ये पराभुत केले होते. या पराभवाचा बदला कोहलीच्या संघाने काढला.

आर.आश्‍विन डझनभर विकेेट
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लड विरूध्दच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात 12 विकेट घेतले. आर.आश्‍विने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच गडी बाद करण्याचा विक्रम 24 वेळा केला. एकाच कसोटीत 10 किवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम आर.आश्‍विने सातवी वेळ आहे.तर भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी हा विक्रम 8 वेळा केला आहे.आश्‍विने इंग्लंड विरूध्द चार कसोटी मालिकेत 27 विकेट घेतल्या आहे.

विराट सामनाविर
व्दिशतकी खेळी करून भारतासाठी विजयाचा पाया रचणारा कर्णधार विराट कोहली याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.राजकोट येथे झालेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता.त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात भारताने 246 धावांनी तर कोलकत्ता येथे झालेल्या तिसर्‍या सामन्यात 8 गड्यांनी विजय मिळविला होता.

कोहली पाच मालिका जिकणारा पहिला कर्णधार
भारताने 3-0 विजयी आघाडी घेतली होती. भारताने चौथ्या कसोटी मध्ये इंग्लंडला एक डाव व 36 धावांनी पराभूत केले. 84 वर्षात पहिल्यांदाच सलग पाच मालिका जिकण्याचा विक्रम भारताने केला. यासोबत सलग पाच सामने जिकणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे.याचबरोबर 139 वर्षाच्या क्रिकेट ईतिहासात एकाच वर्षात तीन व्दिशतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.