भारतात ‘कोरोना बॉम्ब’ फोडण्याचा प्रयत्न

0

नेपाळच्या जालिम मुखियाला अटक

पटना : भारतात कोरोना पसरविण्यासाठी ४० कोरोना संदिग्ध लोकांना पाठविण्याच्या तयारीत असलेल्या जालिम मुखियाला नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. या जालिम मुखियाने ४० तबलिगी जमातीच्या लोकांना आसरा दिला होता.

एसएसबी ने बेतियाच्या पोलिस अधिकार्‍यांना पत्र लिहून नेपाळ सीमेवरून भारतात ४० ते ५० कोरोनाग्रस्त लोक घुसखोरी करणार आहेत. या लोकांना भारतात कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी पाठविण्यात येत आहे. खासकरून बिहारमध्ये हे जैविक मानवी बॉम्ब फोडायचे आहेत. त्यांना जालिम मुखिया मदत करणार आहे, अशी सूचना केली होती. हे पत्र मीडियामध्ये आल्यानंतर खळबळ उडाल्याने बिहार सरकार आणि गृह मंत्रालयाने गंभीरतेने घेत नेपाळ सरकारला कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेलल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये तसा प्रयत्नही करण्यात आला होता.

नेपाळ सीमेवरून भारतविरोधी कारवाया

जालिम मुखियावर आरोप आहे की, त्याने या लोकांना आसरा दिला होता. यानंतर नेपाळ पोलिसांनी जगन्नाथपूरचा महापौर असलेल्या मुखियाला अटक केली आहे. मुखिया हा शस्त्रांची तस्करी करतो. नेपाळ सीमेवरून त्याचा हा गोरखधंदा चालतो. तो जग्रनाथपूर गावातील रहिवासी आहे. माओवाद्यांच्या एका गटातही तो सहभागी असल्याचे सांगितले जाते. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा सदस्यही आहे. गेल्या वेळच्या नेपाळ निवडणुकीत त्याची महत्वाची भूमिका होती. त्याचे गाव हे दोन देशांच्या सीमेवर वसलेले आहे. हा मुखिया जरी राजकारणात असला तरीही त्याआडून तो बनावट नोटा आणि हत्यारांची तस्करी करतो. त्याचे नेपाळच्या एका मंत्र्यासोबतही लागेबांधे आहेत. याच जोरावर मुखिया भारतविरोधी कारवाया करत असतो.

Copy