भारतात कोरोनाची दुसरी लाट जेवढ्या वेगाने आली, तेवढ्याच वेगाने ओसरणार

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आढळणार्‍या रुग्णांमध्ये तोंड कोरडे होणे, घसा दुखणे, जीभ कोरडी पडणे, जीभ पांढरी पडणे किंवा त्यावर पांढरे डाग दिसणे आदी काही नवीन लक्षणे आढळून आली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण संस्थेने दिली आहे. कोरोना रुग्णांना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात ही लक्षण दिसू लागतात. तोंड कोरडे पडणे हे प्रमुख लक्षण आहे. याला जेरोस्टोमिया असे म्हटले जाते. यानंतर त्या रुग्णाला ताप आणि घसा दुखण्यासारखी लक्षणे जाणवू लागतात.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडालेला असताना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. ही लाट जितक्या वेगाने आली होती, तितक्याच गतीने ओसरेल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारतीय लोकसंख्येतील 40 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतील. मागील वर्षी डिसेंबर महिना अखेरीस देशातील 21 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या. एप्रिल अखेरीस हे प्रमाण वाढत जाऊन यामध्ये आणखी 7 टक्क्यांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असणार्‍या लसीकरण मोहिमेमुळे आतापर्यंत जवळपास 12 टक्के जनतेमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील 40 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यापासून दूर असेल.
जीभ कोरडी पडणे
कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडू शकते. यामुळे तोंडात लाळ निर्माण होण्यावर परिणाम होतो. ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसून येतात, त्यांना जेवताना त्रास होतो. लाळ नसल्याने जेवण नीट चावता येत नाही. तसेच बोलण्यामध्येसुद्धा अडचणी येतात. त्यामुळे जर तुम्हाला ही लक्षण जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जुलाब, उलट्या
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबत अतिसार किंवा जुलाब, उलट्या ही नवी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसू लागली आहेत. ही लक्षणे लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Copy