भारताच्या लालरिंन्नुन्गाला रौप्य पदक

0

नवी दिल्ली । जागतिक युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या जेरेमी लालरिंन्नुन्गाने 56 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे.

इंटरनॅशन वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाची कमाई केली. जेरेमी लालरिंन्नुन्गाने रौप्य पदक जिंकत भारताला पहिले पदक पटकावून दिले. लालरिंन्नुन्गाने एकूण 240 किलो वजन उचलत दुसरे
स्थान पटकावले.