भारताचा रशियाबरोबर ‘एस – ४०० क्षेपणास्त्र’ खरेदी करार

0

नवी दिल्ली : अमेरिकेच्या निर्बंधांची शक्यता असताना देखील जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या अत्याधुनिक एस – ४०० या क्षेपणास्त्र खरेदी करारावर रशिया आणि भारताने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा खरेदी करार ४० हजार कोटी रुपयांचा असून ३८० किलोमीटर परिसरातील जेट, ड्रोन तसेच इतर क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची एस – ४०० क्षेपणास्त्राची क्षमता आहे. भारत एकूण ५ क्षेपणास्त्रे रशियाकडून खरेदी करणार आहे. हि खरेदी झाल्यास अमेरिका भारतावर आर्थिक निर्बंध लादण्याची शक्यता आहे. मात्र हा विरोध डावलून हा करार करण्यात आला आहे. भारताने फ्रान्सकडून केलेली राफेल विमान खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.