भारताचा दौरा आव्हानात्मक स्मिथ म्हणतो

0

सिडनी। पाकिस्तान विरूध्द 3-0 विजयानंतर ऑस्ट्रोलियासंघाचे लक्ष भारताच्या दौर्‍याकडे लागले आहे. भारताचा दौरा हा आव्हानात्मक आहे,असा सावधानतेचा इशारा ऑस्ट्रोलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या संघाला दिला आहे. ऑस्ट्रोलिया संघ पुढच्या महिन्यात भारतात होणार्‍या चार कसोटीच्या तयारीला लागणार आहे. ऑस्ट्रोलिया संघात नवे खेळाडू आहे.

भारतातील खेळपट्टी ह्या ऑस्ट्रोलियाच्या तुलनेत फारच वेगळ्या आहे.त्यातच नविन खेळाडू यामुळे ऑस्ट्रोलियाच्या संघाला अनेन आव्हानांना समोरे जावे लागणार आहे. नवे खेळाडू असलेल्या ऑस्ट्रोलिया संघाला परिस्थितीची कल्पना दिली आहे असे स्मिथ म्हणाला. भारत हे पुर्णत: वेगळे ठिकाण आहे.

ऑस्ट्रोलियासारख्या खेळपट्ट्या तिथे नाहीत.खेळाडूंनी तेथील परिस्थितीशी चटकन जुळवून घ्यायला हवे आणि त्या परिस्थितीत विजय नोदवण्यात यश मिळवायला हवे मॅथ्यू रेनशॉ आणि पीटर हँडसकोम्ब या नवोदित फलंदाजांनी पाकिस्ताविरूध्दच्या सामान्यात चांगली कामगिरी केली आहे. या आधीच्या भारताच्या दौर्‍यांमुळे असलेले भय नव्या खेळाडूमध्ये नसेल अशी आशा कर्णधार स्मिथला आहे.2004 नंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारतात एकही कसोटी सामना जिकलेला नाही.भारताविरूध्द झालेल्या या आधीच्या सात सामन्यांतही ऑस्ट्रोलियाला विजय नोदवत आलेला नाही.

संघात नवे खेळाडू आहेत ही गोष्ट एका दृष्टीने उपयुक्त आहे,पण त्या खेळाडूंना भारतातील परिस्थितीचाही अंदाज नाही हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.भारताचा दौरा प्रचंड आव्हानात्मक असेल. आम्हाला भारताला आव्हान द्यायचे असेल तर चांगल्या दर्जाचेेे क्रिकेट खेळणे भाग आहे. आमच्या समोर हे मोठे आव्हान आहे आणि संघाला शिकण्याची मोठी संघी आहे, असेही स्मिथ म्हणाला.भारताने 2013 मध्ये ऑस्ट्रोलियाविरूध्दची कसोटी क्रिकेट मालिका 4-0 अशी जिंकली होती. त्या ऑस्ट्रोलियाच्या संघात स्मिथचा समावेश होता.आमच्यापैकी काही जण भारतात खेळले आहेत.त्यांच्याच घरी जाऊन खेळणे हे खूपच कठीण आहे हे आम्ही जाणतो त्यांचा संघ सर्वोत्तम आहे. आम्ही तिथे उत्तम कामगिरी करू.