‘भारत’मुळे सलमान पुन्हा अडचणीत

0

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने कॉंट्रोव्हर्सी मध्ये असतो. आता सलमान पुन्हा चर्चेत आला आहे. ‘भारत’ या नव्याने येणाऱ्या त्याच्या चित्रपटामुळे तो चर्चेत आला आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिनाला पाकिस्तानचा झेंडा फडकवायचा होता. त्याने हा सीन यशस्वीरित्या केलाही. मात्र याठिकाणच्या लोकांना हे पाहून चांगलाच धक्का बसला. भारतभूमीमध्ये पाकिस्तानचा झेंडा कोणी कसा फडकावू शकतो, म्हणून त्यांनी दंगा केला.

या घटनेनंतर स्थानिकांनी सलमान खान आणि भारत चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली. सलमानने अशाप्रकारे पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यामागे दुसरे कोणतेच कारण नव्हते. तर हा चित्रपटाच्या चित्रिकरणाचा भाग होता असे निर्मात्यांनी या लोकांना बऱ्याचदा समजावले. मात्र या लोकांना निर्मात्यांचे म्हणणे एकून घेण्यात काडीचाही रस नव्हता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे.