Private Advt

भामलवाडीतील शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या

रावेर : तालुक्यातील भामलवाडी येथील 40 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भामलवाडी येथील शेतकरी विजय पाटील (40) यांनी घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. मयत विजय पाटील यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई असा परीवार आहे. याबाबत निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे. कर्जबाजारीला कंटाळून शेतकर्‍यानी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.