Private Advt

भादलीतील 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील भादली बुद्रुक येथील 23 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भरत भिकन पाटील (23, भादली, ता.जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भरत पाटील हा आई-वडील, पत्नी व लहान भावासह वास्तव्यास होता व चारचाकी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करीत होतो शिवाय त्याने काही दिवसांपूर्वी कर्ज काढून चारचाकी वाहन घेतले होते मात्र मंगळवारी 15 मार्च रोजी सकाळच्या सुमारास कुठल्यातरी कारणातून भरतने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्नीसह आई-वडिलांनी हंबरडा फोडला. तातडीने भरतला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील करत आहे.