भातखंडे येथील ज्येष्ठ शिक्षक बी.एन. पाटील यांचा सत्कार

0

भडगाव । भातखंडे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेतील जेष्ठ शिक्षक तथा पत्रकार.बी.एन.पाटील यांना 6जानेवारी 2017 रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा पत्रकार संघाकडुन उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून कृषी व कृषीशी निगडीत बातम्या वेळोवेळी प्रसिद्धीसाठी दिल्यात म्हणून जळगाव जिल्हा पत्रकार संघाने त्यांची दाखल घेऊन त्यांना सन्मानीत केले म्हणून शाळेमध्ये त्यांचा सत्कार आला .

यांची होती उपस्थिती
शाळेचे मुख्याध्यापक श्री .आप्पासाहेब जी.जे.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शाळेतील शिक्षक श्री .एस.बी. भोसले यांनी पुरस्काराबद्दल माहिती सांगितली कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, इग्लिंश मेडियमचे शिक्षक , शिक्षिका . कर्मचारी बंधु भगीनी उपस्थित होते.