भाड्याने घेतलेलीच इनोव्हा कार चोरली; चोरट्यास 20 पर्यंत कोठडी

0

जळगाव । इन्होव्हा कार भाड्याने घेवून लग्नास जात असल्याचे सांगून दोघांनी नेरी-वावडदा ररस्त्यावरून 29 डिसेंबर 2016 रोजी कार चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी एका संशयिताला शुक्रवारी अटक केली. आज त्याला न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्या. गोरे यांनी 20 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

देवांग सतिषभाई रावल वय-27 यांच्या वडीलांची इन्होव्हा (क्रं. जीजे.09.बीडी.1817) कार ही रईस शहा अय्युब शहा यासह एकाने वाशी येथून जामनेर येथे लग्नास जाणे असल्याने भाड्याने घेतली. परंतू 29 डिसेंबर रोजी मध्यरात्री रईस शहा व त्याच्या साथीदाराने विटनेर गाव शिवारातील नेरी-वावडदा रस्त्यावरून कार घेवून पसार झाले होते. याप्रकरणी यानंतर देवांग रावल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीसांना अखेर दिड महिन्यानंतर रईस शहा अय्युब शहा वय-45 रा. श्रीकृष्णनगर, हरसुल जि. औरंगाबाद या एका संशयितास शुक्रवारी अटक केली. त्याला आज शनिवारी न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या.गोरे यांनी रईस शहा याला 20 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.