Private Advt

भाजप प्रवेशाची आणि शंभर कोटी खर्चाची ऑफर: राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

0

सातारा: भाजपकडून प्रवेशाची आणि विधानसभा निवडणुकीत शंभर कोटी रुपये खर्च करण्याची ऑफर होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘मला भाजपकडून प्रवेश करण्याची आणि विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च करण्याची ऑफर देण्यात आली होती’ असे विधान त्यांनी केले आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा विधान परिषदेवर घेण्यात आले. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची चर्चा होती.