भाजप नेत्याचा उतावीळपणा; अमित शहांच्या कोरोना टेस्टबद्दल दिली चुकीची माहिती

0

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मात्र आज दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी ट्वीटकरून अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले होते. मात्र मनोज तिवारी यांचा उतावीळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. अमित शहा यांची कोणत्याही प्रकारची चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही असे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. त्यानंतर मनोज तिवारी यांनी ते ट्वीट डिलीट केले आहे.

आज सकाळीच खासदार मनोज तिवारी यांनी ‘देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, जय सियाराम, हरहर महादेव’ असे ट्वीट त्यांनी केले होते. मात्र चाचणी झालेली नसताना त्यांनी ट्वीट केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केले आहे.

अमित शहांचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला…

Copy