भाजप खासदाराकडून सैनिकांचा अवमान; भाजपने आत्मपरीक्षण करावे: गुलाबराव पाटील

0

मुंबई: भाजपकडून महाराष्ट्र सरकार कोरोनाला नाही तर कंगनाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे आरोप होत आहे. यावर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकार कोरोनाच्या काळात मोठे काम करत आहे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविले, भाजपच्या काळात झाल्या नाही इतके कामे महाविकास आघाडीच्या सरकारकडून सुरु आहे, हे भाजपला सहन होत नाही त्यामुळे भाजपने कंगना आणि सुशांत हे पिल्लू सोडले आहे असा जोरदार हल्लाबोल केला. एका  वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

शिवसेनेला बदनाम करण्याचे हे डाव आहे, मुंबईचे महत्व कमी करण्याचा हा षडयंत्र आहे. हा डाव भाजपने हेतुपुरस्सर आखला आहे असे आरोप गुलाबराव पाटील यांनी केले.

शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. याबाबतही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी एका माजी सैनिकाला मारहाण केली, त्यावर भाजप सरकारने काही कारवाई केली नाही. भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. भाजपने आत्मपरीक्षण करावे असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Copy