भाजपा प्रदेश सरचिटणीसांना जीवे ठार मारण्याची धमकी

0

भुसावळ : शहराचे माजी नगरसेवक व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अजय एकनाथ भोळे यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने मेसेज पाठवत 90 दिवसांच्या आत दिवसाढवळ्या खून करण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोळे यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवार, 23 मार्च रोजी सकाळी 9.26 वाजता त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरून 774488366 या क्रमांकावर संदेश आला व त्यात 90 दिवसांच्या आत तुझा 302 करेल तसेच आपले नाव राजेंद्र उत्तम पवार (व्यंकटेश नगर, जळगाव) असे म्हटल्याचे भोळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शहर पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा भोळे यांनी व्यक्त केली आहे.

Copy