भाजपा नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे आत्मदहन आंदोलन मागे

नगराध्यक्षांकडून दोन मागण्यांना मंजुरी : उर्वरीत मागणीही होणार असल्याचा दावा

भुसावळ : सत्ताधारी नगरसेवक पिंटू (महेंद्र) ठाकूर यांनी प्रभागातील कामे नगराध्यक्षांकडून होत नसल्याने 2 मार्च रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने सत्ताधार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. ठाकूर यांनी केलेल्या दोन मागण्या नगराध्यक्षांनी मान्य केल्या असून उर्वरीत मागणीही लवकरच मान्य होणार असल्याचे नगरसेवक ठाकूर यांनी कळवले आहे.

नेत्यांची शिष्टाई ठरली सफल
माजी मंत्री एकनाथराव खडसे व भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत ठाकूर यांची समजूत काढली तसेच नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे तसेच मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनीदेखील या प्रकरणात मध्यस्थी केल्याने तूर्त आंदोलन मागे घेत असल्याचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी कळवले आहे.

Copy