भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील

0

धुळे : धुळे तालुक्यातील देवेंद्र पाटील यांची धुळे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय रक्षा राज्य मंत्री ना. डॉ. सुभाष भामरे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले आहे.

पाटील यांनी धुळे महानगरात उपाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी बजाविली असून त्यांच्या कार्याची दाखल घेत भारतीय जनता पार्टीने त्यांना धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी बढती दिली आहे. त्यांच्या नियुक्ती प्रसंगी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस (संघटन) किशोर सिंघवी व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.