भाजपा दिव्यांग सेलतर्फे गुरु रविदास महाराजांना अभिवादन

0

धुळे । संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम झाले. महानगरात भाजपा जिल्हाध्यक्ष अनुपशेठ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा दिव्यांग सेलतर्फे फाशीपुल येथील प्रदेश कार्यालयात संत शिरोमणी गुरु रविदास महाजन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुकुंद यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सतिष चांदणे, संतोष जाधव, दिग्विजय गाळणकर, सोशल मिडीया जिल्हा अध्यक्ष किरण देशमुख, अमोल धामणे, दिपक खंडेलवाल, राजेंद्र माने, संदीप बैसाणे, शशी मोगलाईकर, सुरेश ठाकरे, सोनु वाघ, गोरख पाटील, अशोक बोरसे, गणेश देवरे, पठाडे, भटू सुर्यवंशी, शंकर लोंढे, इंदल जाधव, शंकर हरळ आदी दिव्यांग बांधव, समाज बांधव नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.